८अ पडताळणी | 8A Verification
८अ उतारा हा जमिनीच्या मालकीशी संबंधित एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये जमिनीच्या सध्याच्या मालकाची माहिती आणि जमिनीच्या क्षेत्रफळासह इतर महत्त्वाचे तपशील नोंद असतात. ८अ उताऱ्याच्या सत्यतेची आणि अधिकृततेची पडताळणी करण्यासाठी एक विशिष्ट पडताळणी क्रमांक दिला जातो. हा क्रमांक ८अ उताऱ्यावर दिलेला असतो आणि तो ऑनलाईन व ऑफलाईन पडताळणीसाठी उपयोगात आणता येतो.
८अ पडताळणी क्रमांक कोठे असतो?
- ८अ उताऱ्याच्या वरच्या भागात
- Q.R. कोडच्या बाजूला किंवा उताऱ्याच्या शेवटी
- डिजिटल स्वाक्षरीच्या जवळ
८अ पडताळणी क्रमांक कशासाठी वापरला जातो?
- जमिनीच्या अधिकृततेची तपासणी करण्यासाठी
- जमिनीच्या व्यवहारांमध्ये (खरेदी-विक्री, वारस नोंद, बँकेसाठी लोन इत्यादी)
- सरकारी योजना किंवा जमीनविषयक निर्णयांसाठी सत्यापनासाठी
८अ पडताळणी करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर Verify 8A बटनावर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पडताळणी क्रमांक (Verification Number) टाकायचा आहे.

- आता तुमच्या समोर तुम्ही जो पडताळणी क्रमांक टाकला आहे त्याच्या संबंधित माहिती ओपन होईल.
महत्वाचे: जर तुम्हाला तुमच्या ८अ उताऱ्याचा पडताळणी क्रमांक सापडत नसेल, तर तुम्ही स्थानिक तहसील कार्यालयात चौकशी करू शकता.